सनातन संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही बहुपयोगी सात्त्विक भेट-पेटी (‘गिफ्ट बॉक्स’) सिद्ध करण्यात आली आहे. या भेट-पेटीवरील रंगसंगती, अक्षरे, नक्षी इत्यादी ‘ती घेणार्याला आणि देणार्याला अधिक सात्त्विकता मिळावी’, या उद्देशाने बनवण्यात आली आहे. या पेटीवर संतांचे संदेश आणि साधनेविषयी मार्गदर्शनही आहे. त्यामुळे या भेट-पेटीचा वापर करणार्याला आपोआपच धर्मप्रसारात सहभागी होता येईल.
सात्त्विक भेट-पेटीचा वापर पुढीलप्रमाणे करता येईल !
१. या भेट-पेटीमध्ये सनातनची पूजोपयोगी उत्पादने (अत्तर, कापूर, कुंकू, उदबत्ती, अष्टगंध, गोमूत्र-अर्क), नित्योपयोगी उत्पादने (साबण, दंतमंजन, त्रिफळा चूर्ण, उटणे, केशतेल, संस्कार वही), तसेच ग्रंथ अन् लघुग्रंथ आकर्षकरित्या ठेवून इतरांना दिल्यास तो एक ‘सात्त्विक भेटसंच’ ठरेल. (‘या भेटसंचात कोणती उत्पादने आणि ग्रंथ ठेवायचे ?’, हे हितचिंतक आपापल्या आवडीनुसार ठरवू शकतात. उत्पादने वा ग्रंथ यांच्या संख्येनुसार भेटसंचाची रक्कम ठरेल.)
२. दीपावलीच्या निमित्ताने व्यापारी संकुले (‘शॉपिंग मॉल्स’, ‘सुपर बझार’ इत्यादी), वस्त्रदालने, मिठाई भांडार (‘स्वीट मार्ट’) इत्यादींचेे मालक ग्राहकांना भेटवस्तू देतात. ही भेटवस्तू या आकर्षक भेट-पेटीत घालून देता येईल.
३. विवाह, नामकरण विधी, वाढदिवस, वास्तूशांत इत्यादी कार्यक्रमांच्या निमित्ताने इतरांना भेटवस्तू देतांना ती रंगीत कागदात आच्छादित करून देण्याऐवजी या पेटीत घालून देऊ शकतो.
४. पूजासाहित्य, तसेच नित्योपयोगी साहित्य ठेवण्यासाठीसुद्धा ही पेटी उपयुक्त आहे. केवळ दिवाळी इत्यादी सणांच्या निमित्तानेच नव्हे, तर वर्षभरही या बहूपयोगी पेटीचा वापर करता येईल.
५. साधक या पेटीत वैयक्तिक उपायांचे साहित्यही ठेवू शकतात.