पुणे येथे ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त

५०४ आरोपींना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – चालू वर्षातील ऑक्‍टोबरपर्यंत ४०९ प्रकारच्‍या कारवाईमध्‍ये ९ सहस्र ३५५ किलो ६८ ग्रॅम वजनाचे १४ कोटी ५५ लाख ३४ सहस्र २२३ रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्‍त करण्‍यात आले आहेत. त्‍यात ५०४ आरोपींना अटक करण्‍यात आली. ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्‍तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे लोहमार्ग (रेल्‍वे पोलीस) पोलीस अधिक्षक कार्यालयाने केली आहे.

भारत सरकारच्‍या गृह मंत्रालयाच्‍या निर्देशानुसार अमली पदार्थांच्‍या वापरावर आळा घालणे. अमली पदार्थांची समस्‍या प्रभावीपणे हाताळण्‍यासाठी जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हास्‍तरीय ‘अमली पदार्थ विरोधी केंद्र समिती’ची स्‍थापना केली आहे. यामध्‍ये एकूण १३ सदस्‍य नेमलेले आहेत. या समितीची प्रत्‍येक मासाला जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक घेण्‍यात येते. अमली पदार्थांची होणारी अवैध तस्‍करी, लागवड, वापर, विक्री, सेवन यांविषयी पोलीस विभागाच्‍या साहाय्‍याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्‍यात येते.

संपादकीय भूमिका :

  • अमली पदार्थांच्‍या विळख्‍यात अडकलेले पुणे !
  • कित्‍येक दशकांपासून चालणारी अमली पदार्थांची विक्री रोखू न शकणे, हे शासनकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !
  • समाज व्‍यसनापासून दूर रहाण्‍यासाठी त्‍याला धर्मशिक्षण देऊन सुसंस्‍कारित करणे अपरिहार्य !
  • तरुण पिढीला अमली पदार्थांचे व्‍यसन लावणार्‍या गुन्‍हेगारांवर कडक कारवाई करून त्‍यांचे जाळे नेस्‍तनाबूत करणे आवश्‍यक आहे !