मुंबई – मालवणी परिसरातील एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने १० वर्षीय मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी ५५ वर्षीय सुरक्षा रक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून आरोपी सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलगी इमारतीतील पायर्यांवरून खाली जात होती. त्या वेळी तिच्या समवेत कुणी नसल्याचे पाहून त्याने तिचा विनयभंग केला. तिने घाबरून हा प्रकार आईला सांगितला. आईने याविषयी पोलिसांना कळवल्यावर त्यांनी वरील कारवाई केली.
संपादकीय भूमिकावासनांध वृत्ती असणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |