ठाणे, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – डोंबिवली पूर्व येथील डी.एन्.सी. शाळेच्या मैदानात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या वतीने ‘रासरंग दांडिया २०२३’ या कार्यक्रमाचे १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डोंबिवली परिसरात विशेष कार्य करणार्या महिलांचा ‘नवदुर्गा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात सनातन संस्थेच्या डोंबिवली येथील साधिका श्रीमती अमृता संभूस यांना हा मानाचा पुरस्कार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच महिला पदाधिकार्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि पैठणी देण्यात आली. सन्मान करतांना सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना आणि हिंदूंमध्ये धर्मजागृती करण्याचे कार्य करत असल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख श्री. राजेश मोरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.