मुंबई – उपक्रमातील ७२५ पैकी १२३ कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.