मुंबई – शासनाच्या विविध विभागांद्वारे राबवल्या जाणार्या जनकल्याणकारी शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचाव्यात, यासाठी राज्यशासनाने एका समितीची स्थापना केली आहे. शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी ही समिती कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून सरकारला सादर करणार आहे. केंद्रशासनाच्या विविध योजनांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येतो. या पार्श्वभूमीवर राज्यशासनही अशा प्रकारे कार्यवाही करणार आहे. वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. यामध्ये विविध विभागांच्या सचिवांचा समावेश आहे.