राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण !

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने दसरा चौक येथे निषेध करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाईची मागणी करण्यात आली. या संदर्भात अध्यक्ष सुनील गाताडे म्हणाले, ‘‘आमदार आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे देशभरातील ८ कोटी वीरशैव लिंगायत बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी वीरशैव लिंगायत समाजाचा, तसेच समाजाचे दैवत असणारे महात्मा बसवेश्वर यांचा अयोग्य उल्लेख केला, तर त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल.’’
या प्रसंगी राजू वाली, नानासाहेब नष्टे, राजेश पाटील (चंदूरकर), सतीश खोतलांडे, किरण सांगावकर, चंद्रकांत हळदे, राजेंद्र करंबळी, अशोक माळी, महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बोधले, राणी चन्नम्मा महिला मंडळाच्या अध्यक्षा वारणा वडगावकर, मंदा कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
भारतीय धर्मग्रंथांचे साम्यवादी दृष्टीने अर्थ लावून हिंदु धर्म नष्ट करण्याचे षड्यंत्र रचणारे शेल्डन पॉलॉक !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण