गोवा : पेडणे येथे दुभती गाय आणि वासरू यांच्यावर अमानुषपणे आक्रमण

एका वासराला मरेपर्यंत मारले, तर अन्य एक वासरू आणि गायी यांना गंभीररित्या घायाळ केले

‘‘गायी या माझ्या उपजीविकेचे एकमेव साधन असल्याने मी आता कसे जगायचे ?’, असा प्रश्न प्रतिमा कोरगावकर यांनी उपस्थित केला आहे.

पेडणे, १६ ऑक्टोबर (वार्ता.) : कोरगाव, पेडणे येथील दुग्ध व्यावसायिक प्रतिमा कोरगावकर यांच्या २ गायी आणि २ वासरे यांच्यावर आक्रमण करण्यात आले. यांपैकी एक वासरू आणि १ दुभती गाय यांच्यावर अमानुषपणे आक्रमण करण्यात आले. यात वासराचा मृत्यू झाला. अन्य एक वासरू आणि गायी गंभीररित्या घायाळ झाल्या आहेत.

 (सौजन्य : OHeraldo Goa)

‘‘गायी या माझ्या उपजीविकेचे एकमेव साधन असल्याने मी आता कसे जगायचे ?’, असा प्रश्न प्रतिमा कोरगावकर यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी या घटनेविषयी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून घटनेचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी केली आहे. प्रतिमा कोरगावकर यांचे पती हल्लीच वारले आणि त्यांच्या मुलाचेही आरोग्य बरे नसते. प्रतिमा कोरगावकर सकाळी दूध काढण्यासाठी त्यांच्या गोठ्यात गेल्या असता त्यांना हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. सरकारने या प्रकरणी साहाय्य करण्याची मागणी त्यांनी केली आहे.