कोल्हापूर – दोनच दिवसांपूर्वी भ्रमणभाषवर धर्मांध टिपू सुलतानचा ‘स्टेटस’ (‘स्टेटस’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी स्वतःच्या भ्रमणभाषवर ठेवलेले चित्र किंवा लिखाण) ठेवल्याचे प्रकरण ताजे असतांना १६ ऑक्टोबरला पहाटे श्री शिवप्रतिष्ठानच्या श्री दुर्गामातेच्या दौडीच्या मार्गावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्याचा प्रकार उघडकीस आला. कसबा बावडा परिसरात असलेल्या रस्त्यावर ‘भारत का बादशाह टिपू सुलतान’, अशा आशयाचा मजकूर लिहिलेला आढळून आला. यामुळे काही काळ धारकरी, हिंदुत्वनिष्ठ यांनी आक्रमक भूमिका घेत मजकूर लिहिणार्यांवर कारवाईची मागणी केली. (दोन दिवसांपूर्वी प्रकार होऊन या प्रकरणात अटक झाल्यावरही परत धर्मांध टिपू सुलतानचे उदात्तीकरण होते, याचा अर्थ धर्मांधावर कोणत्याही प्रकारचा वचक आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही, हेच सिद्ध होते ! आता प्रकार परत होणार नाही, यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक)
पोलिसांनी घटनास्थळी येऊन मजकूर पुसून टाकला. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी ‘परत असा प्रकार झाल्यास हिंदूंच्या भावनांचा उद्रेक होईल’, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. संजय जासूद यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.
संपादकीय भूमिकाहिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतान डोक्यावर घेणारे भारताच्या सुरक्षेला धोकादायक ! |