साधकांनो, परात्‍पर गुरु डॉ. आठवले किंवा संत यांनी काही सांगितल्‍यास ‘त्‍यांचा संकल्‍प झाला’, असे म्‍हणून न थांबता साधनेचे प्रयत्न योग्‍य प्रकारे करून त्‍यांचा संकल्‍प फलद्रूप झाल्‍याची अनुभूती घ्‍या !

सुश्री (कु.) दीपाली होनप

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले किंवा संत एखाद्या सत्‍संगात साधकांना सांगतात, ‘‘आता तुमची आध्‍यात्मिक प्रगती चांगली होईल.’’ त्‍यानंतर साधक त्‍याविषयी इतर साधकांशी बोलतांना सांगतात, ‘‘आता परात्‍पर गुरु डॉक्‍टर / संत यांचा संकल्‍प झाला आहे. त्‍यामुळे आता तसेच होणार. (आमची आध्‍यात्मिक प्रगती होणार.)’’ त्‍यानंतर साधकांच्‍या प्रयत्नांत शिथिलता येत असल्‍याचे लक्षात येते.

येथे साधकांनी लक्षात घ्‍यायला हवे, ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर किंवा संत जेव्‍हा बोलतात, तेव्‍हा त्‍यांचा संकल्‍प झालेला असतो; पण साधकांनी त्‍यांचे क्रियमाण योग्‍य प्रकारे वापरल्‍यासच, म्‍हणजे साधनेचे प्रयत्न योग्‍य प्रकारे केल्‍यासच परात्‍पर गुरु डॉक्‍टर किंवा संत यांचा संकल्‍प कार्यरत होतो आणि योग्‍य वेळी फलद्रूप होतो. त्‍यामुळे ‘ते बोलले, म्‍हणजे संकल्‍प झाला’, येथवर न थांबता तो संकल्‍प कार्यरत आणि फलद्रूप होण्‍यासाठी साधकांनी साधनेचे प्रयत्न योग्‍य प्रकारे करणे आवश्‍यक आहे.’ – सुश्री (कु.) दीपाली होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०२३)