आपच्या जिल्हा उपाध्यक्ष यामीन उल् इस्लाम यांनी पंतप्रधानांचे आक्षेपार्ह छायाचित्र केले प्रसारित !

  • बरेली (उत्तरप्रदेश) येथील घटना !

  • पोलिसांनी स्वत:हून प्रविष्ट केली तक्रार !

उल् इस्लाम उपाख्य अजीम प्रधान

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील यामीन उल् इस्लाम उपाख्य अजीम प्रधान या आम आदमी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित केले आहे. यावरून इस्लाम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाची तक्रारही पोलीस उपनिरीक्षक नरेश शर्मा यांनी स्वत: प्रविष्ट करून गुन्हा नोंद केला. ही घटना बरेली जिल्ह्यातील भोजीपूर येथील आहे.

इस्लाम यांनी पंतप्रधानांचे मूळ छायाचित्र घेऊन त्याच्याशी छेडछाड केली. निरमा या कपडे धुण्याच्या पावडरच्या वेष्टनावर पांढरा फ्रॉक घातलेल्या मुलीचे चित्र असते. त्या मुलीच्या चेहर्‍याच्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे.  छायाचित्राच्या खाली ‘दुधासारखा पांढरेपणा भाजपमधून आला. भ्रष्टाचार केलेला प्रत्येक नेता स्वच्छ झाला. डाग असलेले (कलंकित) नेते (धुलाई यंत्रात) घाला आणि त्यांना साफ करा. भाजपची वॉशिंग पावडर’, अशा प्रकारे लिहिण्यात आले आहे. याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही आक्षेप घेतला होता.

संपादकीय भूमिका 

उत्तरप्रदेश पोलिसांच्या या कारवाईवरून ते ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटत आहेत’, अशा प्रकारे कुणी आरोप केला, तर आश्‍चर्य वाटू नये !