
वॉशिंग्टन – खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कुठल्याही ठोस पुराव्यांविना भारतावर केलेले आरोप दुर्दैवी आहेत, असे मत ‘अमेरिका भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरम्’ (यु.एस्.आय.एस्.पी.एफ्.) या संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अघी यांनी व्यक्त केले. या आरोपानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने कॅनडाचे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.

अघी पुढे म्हणाले की, ‘भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध फार जुने आहेत. दोन्ही देशांमध्ये मोठा व्यापार चालू आहे. कॅनडामध्ये २ लाख ३० सहस्रांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कॅनडाने भारतात अनुमाने ५५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप देशांतर्गत राजकारणामुळे प्रेरित आहेत.’
Modi & Donald Trump G7 Meet : जर भारतावर आक्रमण झाले, तर आम्ही भारतासमवेत राहू ! – ट्रम्प
Strait Of Hormuz : इराणला आता असे शस्त्र मिळाले आहे, जे अणूबाँबपेक्षा अधिक प्रभावी !
रशियन तेलवाहू नौकेच्या भारतीय कॅप्टनच्या अटकेने रशिया संतप्त
Muslim man arrested for spying for Pakistan : जैसलमेर (राजस्थान) येथून पाकसाठी हेरगिरी करणार्या मुसलमानाला अटक
A loss of ₹4,300 Crore to a Turkish entity : भारताच्या एका निर्णयामुळे तुर्कीयेच्या आस्थापनाला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी