सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘मायेच्‍या विषयात काही विशेष अर्थ नसल्‍याने आता पूर्णपणे आध्‍यात्मिक विषयांकडे लक्ष द्या’, असा निरोप पाठवल्‍याचा प्रसंग आठवून कृतज्ञता वाटणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेला निरोप ऐकल्‍यावर भावाश्रू येणे

‘पूर्वी माझे ‘फौंड्री’ संदर्भातील शोधनिबंध राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होऊन एकदा मला परदेशात जाऊन एक शोधनिबंध सादर करण्‍याच्‍या संदर्भात निमंत्रणसुद्धा आले होते. नंतर एका प्रसंगी माझी मुलगी (सौ. नेहा नागेश जोशी, पुणे) रामनाथी आश्रमात जाऊन परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) भेटली होती. तेव्‍हा तिला ते म्‍हणाले होते, ‘‘आता तुझ्‍या बाबांना सांग, ‘या मायेच्‍या विषयात काही विशेष अर्थ नसतो. आता पूर्णपणे आध्‍यात्मिक विषयांकडे लक्ष द्या.’’ सौ. नेहाने मला हे सांगितले. तेव्‍हा माझ्‍या डोळ्‍यांत भावाश्रू आले होते. त्‍यानंतर मी मायेतील विषयांऐवजी साधनेसाठी अधिकाधिक वेळ देऊ लागलो.

श्री. अरुण डोंगरे

२. ‘एका रत्नपारख्‍याने त्‍याचा जन्‍म साधनेसाठी न वापरता दगड पारखण्‍यात घालवणे’, याविषयी वाचल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी दिलेल्‍या निरोपाची आठवण होणे

२२.७.२०२३ या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये एक सूत्र प्रसिद्ध झाले होते. त्‍यात ‘जन्‍म-मृत्‍यूच्‍या चक्रातून सोडवते, तीच खरी विद्या !’, या शीर्षकाखाली एका रत्नपारख्‍याने मनुष्‍यजन्‍म आणि त्‍यात इतकी उत्तम बुद्धी मिळूनसुद्धा तिचा उपयोग जन्‍म-मृत्‍यूच्‍या चक्रातून सुटण्‍यासाठी न करता दगड पारखण्‍यात घालवल्‍याविषयी त्‍याला दूषण देण्‍यात आले होते.

वरील सूत्र दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये वाचल्‍यानंतर मला माझ्‍या जीवनातील काही वर्षांपूर्वीचा वरील प्रसंग आठवला आणि ‘मला साधनेकडे अधिकाधिक वळवण्‍यासाठीच परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी तो निरोप दिला होता’, या विचाराने माझ्‍या डोळ्‍यांत कृतज्ञतेने भावाश्रू आले.

या काळात मला विशिष्‍ट प्रसंगांमध्‍ये नवजीवन देऊन सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव माझ्‍याकडून मनापासून साधना करवून घेत आहेत; म्‍हणून त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.७.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक