
नको राग नको कुणाचा हेवा ।
शिकायचे अध्यात्म हाच ठेवा ॥
सनातनची कीर्ती जगी करूया ।
हेचि दान आम्हा देगा देवा ॥ १ ॥
आहे जगण्यापुरती साधनसंपदा ।
आणखी कशाला हवी धनसंपदा ॥
इथे कुणीही कुणाचे नसतांना ।
आलो तसा जाणार शरिराविना ॥ २ ॥
सनातन धर्म म्हणजेच ईश्वर होय ।
शिकून घेऊया आलो जन्माला ॥
तू कोण आलास सनातनला संपवायला ।
तूच जाशील रसातळाला ॥ ३ ॥
मूर्खाचे पाऊल पडते विनाशाकडे ।
तरीपण लक्ष शिव्या देण्याकडे ॥
सजीवपणाचा अहंकार का ।
निर्जीव दगड उपयोगी आला ॥ ४ ॥
सनातनचे कार्य करणारे वीर गडे ।
बाकी नाहक बडबडणारे गधडे ।
पाप्यांनो पाप कशाला वाढवूया ।
सद़्गुरु सत्संगाची कास धरूया ॥ ५ ॥
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा. (१.१०.२०२३)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या स्थळी सनातन राष्ट्रध्वज फडकवण्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे
देवाच्या प्राप्तीसाठी एका क्षणात मायेचा त्याग करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
कै. (श्रीमती) उषा बोकाडे यांच्या रुग्णाईत स्थितीत आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !