
१. साधिका मिरज आश्रमात असतांना प.पू. डॉक्टरांनी साधिकेच्या नकळत देवद (पनवेल) येथे रहाणार्या तिच्या मुलांना साधिकेच्या नावाने प्रसाद पाठवणे

‘८.७.२००३ ते १८.८.२००३ या कालावधीत मी पू. विमल फडकेआजी (आताच्या प.पू. विमल फडके) यांच्या समवेत मिरज आश्रमात रहात होते. त्या कालावधीत प.पू. डॉक्टरांनी माझ्या नावे देवद (पनवेल) येथे सनातन संकुल येथे रहाणारी माझी मुले (सौ. नम्रता दिवेकर (पूर्वाश्रमीची कु. नम्रता गाडगीळ आणि श्री. निनाद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३९ वर्षे) यांना प्रसाद पाठवला. प्रत्यक्षात याविषयी मला काहीच कल्पना नव्हती. मुलांनी मला दूरभाष करून प्रसाद मिळाल्याविषयी कळवले; मात्र मी प्रसाद पाठवलाच नव्हता. त्यामुळे ‘तो प्रसाद कुणी पाठवला असेल ?’, याचे मलाही आश्चर्य वाटले. त्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘हा प्रसाद इतर कुणीही पाठवलेला नसून प.पू. डॉक्टरांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) पाठवला होता.’ याविषयी मी प.पू. डॉक्टरांना विचारले असता त्यांनी केवळ स्मित केले.
२. देवद आश्रमात जाण्यापूर्वी प.पू. डॉक्टरांनी साधिकेच्या घरी जाऊन तिच्या मुलाची भेट घेणे आणि ‘आई अन् आजी चांगल्या असून काळजी करू नकोस’, असे सांगून आश्वस्त करणे
त्याच कालावधीत प.पू. डॉक्टर देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात जाणार होते. प.पू. डॉक्टर आश्रमात जाण्यापूर्वी प्रथम सनातन संकुल येथील पू. फडकेआजींच्या घरी आले. त्या वेळी माझा मुलगा श्री. निनाद एकटाच घरात होता. प.पू. डॉक्टरांनी निनादला आवर्जून सांगितले, ‘‘तुझी आई आणि आजी चांगल्या आहेत. तू काळजी करू नकोस.’’ प.पू. डॉक्टरांनी निनादला प्रसाद दिला आणि नंतर ते आश्रमात गेले.
३. प.पू. डॉक्टर घरी आल्यावर त्यांनी स्वतः खाण्यापूर्वी पू. आजींना डोश्याचा घास भरवणे आणि नंतर स्वतः खाणे
पू. फडकेआजी साडेतीन वर्षे अंथरुणाला खिळून होत्या. त्या कालावधीत प.पू. डॉक्टर देवद आश्रमात येत असत. १२.७.२००६ या दिवशी ते पू. आजींना भेटायला सनातन संकुल येथील त्यांच्या घरी आले हाेते. त्या वेळी मी त्यांच्यासाठी डोसे आणि चटणी केली होती. त्यांनी डोसा आणि चटणी खाण्यापूर्वी पू. आजींना एक घास भरवला आणि नंतरच स्वतः खाल्ला.
४. पू. आजींना होणार्या सर्व प्रकारच्या त्रासांत प.पू. डॉक्टरांनीच सांभाळणे; मात्र त्यांनी कौतुक कुटुंबियांचेच करणे

पू. आजी साडे तीन वर्षे अंथरुणाला खिळून होत्या. त्यांना होणार्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांत प.पू. डॉक्टरच सूक्ष्मातून पू. आजींना सांभाळत होते; मात्र कौतुक ते आमच्या कुटुंबियांचेच करत असत. ते म्हणायचे, ‘‘तुम्ही सर्व जण पू. आजींना चांगल्या प्रकारे सांभाळत आहात. त्यामुळे मला पू. आजींची काळजी नाही.’’
‘प.पू. डॉक्टर, वरील सर्व प्रसंगांतून मला आपली अपार प्रीती अनुभवता आली. या प्रसंगांना २० ते २२ वर्षे उलटून गेली असली, तरीही त्या दैवी क्षणांचे स्मरण झाल्यावर अजूनही माझी भावजागृती होते. ‘केवळ आपल्या कृपेमुळेच त्या क्षणांचे अजूनही मला स्मरण होते’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.६.२०२६)
ही आहे कृतघ्नपणाची परिसीमाच !
देवाच्या प्राप्तीसाठी एका क्षणात मायेचा त्याग करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
कै. (श्रीमती) उषा बोकाडे यांच्या रुग्णाईत स्थितीत आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
प्रेमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा वर्धा येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीरंग नीरज क्षीरसागर (वय १२ वर्षे) !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मंगळुरू सेवाकेंद्रातील साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !