मालदीवचे राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यावर चीन समर्थक महंमद मुइज्जू यांची घोषणा !
माले (मालदीव) – मालदीवमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये चीन समर्थक महंमद मुइज्जू हे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर दिलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी, ‘देशातील विदेशी सैन्याला हटवण्यात येईल; कारण लोकांनी मला यासाठीच मतदान केले आहे’, अशी घोषणा केली आहे. मालदीवमध्ये सध्या भारतीय सैन्य तैनात आहे. भारतीय सैन्यालाच लक्ष्य करून त्यांनी हे विधान केले आहे.
मालदीव में चीन समर्थक सरकार काबिज, अब भारतीय सैनिकों को हटाएंगे राष्ट्रपति मोहम्मद मुइज्जू#Maldives #MohamedMuizzu #IndianSoldiershttps://t.co/UoYcAfiEHD
— India TV (@indiatvnews) October 3, 2023
संपादकीय भूमिकामालदीव हा संरक्षणदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाचा देश आहे. त्यामुळे तेथे चिनी समर्थक राष्ट्रपती म्हणून निवडून येणे, भारतासाठी घातक आहे. भारताला यापुढे आणखी सतर्क रहावे लागेल ! |