कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे ईदच्या फेरीत सहभागी धर्मांध मुसलमानांनी एका हिंदूच्या घरावर केली दगडफेक !

प्रतिकात्मक छायाचित्र

कुशीनगर (उत्तरप्रदेश) – येथे ईदच्या निमित्ताने २८ सप्टेंबर या दिवशी काढण्यात आलेल्या एका फेरीमध्ये ‘डीजे’वरून हिंदूंच्या विरोधात एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे उपरोधिक भाषण ऐकवण्यात येत होते. याला एका हिंदु तरुणाने विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांनी त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. यामुळे तेथील हिंदूही रस्त्यावर उतरले. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी ६ व्यक्तींना अटक केली असून यांत ५ मुसलमान युवकांचा समावेश आहे. तसेच डीजेसाठी वापरलेल्या २ ट्रॅक्टर आणि ट्रॉली यांना कह्यात घेण्यात आले आहे. घटना शहरातील गोला बाजार भागात घडली.

शहरातील प्रिंस जायसवाल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी १४ लोकांसह काही अज्ञातांच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण करणे, दगडफेक करणे आदी कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

  • केवळ इस्लामी पाकिस्तान अथवा बांगलादेशच नाही, तर हिंदूबहुल भारतातील हिंदूही असुरक्षित आहेत, हेच वारंवार घडणार्‍या आक्रमणांच्या अशा घटनांतून लक्षात येते.