संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्यांना हिंदु विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सांगितले !

शिक्षिकेला अटक

संभल (उत्तरप्रदेश) – येथील दुगावर गावात असणार्‍या सेंट अँथनी उच्च माध्यमिक शाळेमध्ये शाईस्ता नावाच्या मुसलमान शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्यांना एका हिंदु विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सांगितल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर शाईस्ता हिला अटक करण्यात आली आहे. तसेच शाळेने तिला निलंबित केले आहे.

पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, हिंदु असल्यावरून शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्यांना त्याला मारहाण करण्यास सांगितले. यामुळे मुलगा भीतीपोटी आणि लाजेमुळे शाळेत जात नव्हता. त्याला याविषयी विचारणा केल्यावर त्याने घडलेल्या घटनेची माहिती दिली.

संपादकीय भूमिका

अशा मानसिकतेच्या शिक्षिका विद्यार्थ्यांना काय शिकवत असणार, याची कल्पना येते !