ठाणे, १६ सप्टेंबर (वार्ता.) – शांतीनगर पोलीस ठाणे येथे प्रविष्ट करण्यात येणार्या तक्रारीचे प्रकरण मिटवण्यासाठी भिवंडी येथील नियंत्रण कक्षातील पोलीस नाईक मिलिंद निकम यांनी तक्रारदाराकडून १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यांपैकी ५ लाख रुपयांची रक्कम तक्रारदाराकडून त्यांनी घेतली होती. त्यानंतर पुन्हा निकम यांनी तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर पडताळणी केली असता, निकम यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी निकम यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (लाचखोरी मुळापासून नष्ट होण्यासाठी लाचखोरांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक)