राजगुरुनगर (पुणे) नगर परिषद येथील लाच प्रकरण
राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – आरोग्य विभागाला पुरवठा केलेल्या साहित्याचे देयक काढण्यासाठी ८ सहस्र रुपयांची लाच मागितली आहे. राजगुरुनगर नगर परिषदेतील मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, आरोग्य विभागाच्या अभियंता चारुबला हरडे आणि लेखापाल प्रवीण कापसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही घटना १३ सप्टेंबर या दिवशी नगर परिषदेच्या कार्यालयात घडली. या प्रकरणी २९ वर्षीय व्यक्तीने तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारदार हे सरकारी ठेकेदार आहेत. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल. – संपादक)
संपादकीय भूमिकालेखापालच लाच घेऊ लागले, तर प्रशासनाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणार कोण ? |