‘एन्.आय.ए.’ची घोषणा
पुणे – ‘इसिस’ आणि ‘अलसूफा’ या आतंकवादी संघटनांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) अन्वेषण चालू केले आहे. महंमद शफीउझ्मा, रिझवान हाजीअली, अब्दुल्ला शेख आणि तल्हा खान या ४ पसार आतंकवाद्यांना पकडण्यासाठी ‘एन्.आय.ए.’ने प्रत्येकी ३ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या सिद्धतेत असलेल्या आतंकवाद्यांना पुणे पोलिसांनी कोथरूड भागातून अटक केली होती. राज्य आतंकवादविरोधी पथकाकडून (ए.टी.एस्.) ‘एन्.आय.ए.’कडे नुकतेच अन्वेषण हस्तांतरित करण्यात आले होते.
पसार आतंकवादी मूळचे मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश येथील रहिवासी आहेत. चौघांनी देशभरात आतंकवादी आक्रमणे करण्याचा कट रचल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. त्यांना पकडण्यासाठी देशभरातील पोलिसांना त्यांची छायाचित्रे आणि माहिती पाठवण्यात आली आहे. ‘एन्.आय.ए.’चे प्रमुख दिनकर गुप्ता यांनी पसार आतंकवाद्यांची माहिती देणार्यास प्रत्येकी ३ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे.