भारतातील ‘जी-२०’ परिषदेत निमंत्रण न मिळाल्याने पाकिस्तामधील नागरिकांची स्वतःच्या देशावरच टीका !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतात चालू झालेल्या २ दिवसांच्या जी-२० परिषदेला जगभरातील २८ देशांचे प्रमुख उपस्थित आहेत. भारताकडून नियोजनबद्धरित्या या परिषदेचे आयोजन केल्याने अनेक देशांकडून कौतुक केले जात असतांना भारताचा शेजारी आणि शत्रू राष्ट्र पाकिस्तानच्या नागरिकांकडून मात्र स्वतःच्या देशावरच टीका केली जात आहे. पाकमधील एक ‘यू ट्यूब चॅनल’ ‘रियल एंटरटेनमेंट’वर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये निवेदक लोकांना विचारतो, ‘भारत इतका पुढे गेला आहे आणि पाकिस्तान मागे का राहिला ?’ यावर लोकांनी वेगवेगळी उत्तरे दिली. एकाने म्हटले ‘आम्हाला फारच लाज वाटत आहे की, आपण (पाकिस्तान) अण्वस्त्र संपन्न देश असूनही भारताने आपल्याला या परिषदेचे आमंत्रण दिले नाही; मात्र बांगलादेशला आमंत्रित केले आहे.
Pakistan: जी20 के भव्य आयोजन को देख तिलमिलाए पाकिस्तानी, बोले- ‘हम परमाणु शक्ति, हमें ही नहीं बुलाया!’#G20SummitDelhi #G20India2023 #G20India #Pakistan #NuclearPower #PakistanEconomicCrisishttps://t.co/ZfohOMWJuc
— Amar Ujala (@AmarUjalaNews) September 9, 2023
१. एकाने म्हटले की, पाकिस्तान चुकून स्वतंत्र झाला. त्या वेळेच्या लोकांनी फाळणीला विरोध केला, तो योग्य होता.
२. अन्य एकाने ‘भारत आपल्यापेक्षा फारच पुढे गेला आहे. भारतातील काश्मीरमध्ये आपल्या देशातील लोकांपेक्षा अधिक सुविधा मिळत आहेत. त्यांच्याशी आपली तुलना होऊ शकत नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पाकिस्तान जी20 का हिस्सा क्यों नहीं है? क्या कभी जी20 में शामिल हो सकता है पाकिस्तान? #G20 #G20Summit #Pakistanhttps://t.co/IMxBan6kad
— ABP News (@ABPNews) September 9, 2023
३. अन्य एकाने म्हटले की, पाकिस्तान भूकेकंगाल देश असून अशा देशाशी कुणीही संबंध ठेवत नाही. प्रत्येकाला वाटते की, पाकिस्तान त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी आला आहे.
४. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा समर्थक म्हणाला, ‘जर इम्रान खान पंतप्रधान असते, तर पाकिस्तानमध्ये ‘जी-२०’ची परिषद झाली असती.’ यावर त्याला निवेदकाने सांगितले की, पाकिस्तान या परिषदेचा सदस्य नाही. त्यामुळे हे शक्य नाही.