
तुळजापूर – तुळजाभवानी मंदिर संस्थानातील सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्थेत गैरव्यवहार होत असल्याची तक्रार करत नागरिकांच्या शिष्टमंडळाने मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनावर अधिवक्ता धीरज पाटील, सर्वश्री अमोल कुतवळ, रणजित इंगळे, आनंद जगताप आणि अक्षय परमेश्वर यांच्या स्वाक्षर्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, मंदिरातील सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्था यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ‘बीव्हीजी’ आणि ‘एस्.आय.एस्.पी.एल्.’ या आस्थापनांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्षात किती कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्या उपस्थितीची बोटांच्या ठशांद्वारे उपस्थिती (बायोमेट्रीक) घेतली जाते का ? त्या नोंदींची नियमित पडताळणी केली जाते का ? याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, तसेच काही कर्मचारी आणि कथित बोगस पुजारी यांच्या संगनमताने व्हीआयपी प्रवेशद्वारातून भाविकांना दर्शन घडवून आर्थिक व्यवहार होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २३.०६.२०२६)
तुळजापूर येथे निष्क्रीय पोलीस प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण !
ठाकरे गटाच्या ६ खासदारांचा शिवसेनेत प्रवेश !
आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !
विधान परिषद तालिका सभापतींची नियुक्ती घोषित !
विधान परिषद महायुतीचा विजय : १७ पैकी १६ जागांवर वर्चस्व !