
पुणे – वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवा पिढीने काळानुरूप स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याची आवश्यकता आहे. तरुणांनी संशोधक वृत्ती जोपासण्यासमवेत झपाट्याने पालटणारे तंत्रज्ञान अवगत करावे, असे विधान ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ (आयआयआयटी) रायपूरचे माजी कुलगुरु, तसेच संचालक डॉ. पी.के. सिन्हा यांनी केले. येवलेवाडी येथील ‘केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स’ संचालित ‘केजे कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च’च्या वतीने ‘इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स’ (आयईईई) यांच्या तांत्रिक सहकार्याने ‘इनोव्हेशन अँड ग्रोथ इन नेक्स्ट जेन इंटेलिजंट टेक्नॉलॉजी अँड इंजिनीयरिंग (इग्नाइट) २०२६’ या ३ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे प्र(उप)-कुलगुरु, ‘सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशन’चे अध्यक्ष, ‘केजे शिक्षण संस्थे’च्या व्यवस्थापकीय संचालिका, कार्यकारी संचालक, तांत्रिक संचालक, प्राचार्य, ‘इग्नाइट’च्या अध्यक्षा, ‘आईईई’चे पुणे विभागाचे सचिव आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी योग्य दिशेने कृतीशील होणे आवश्यक आहे. आव्हानात्मक काळात चांगली पिढी घडवण्याचे दायित्व शिक्षकांवर आहे. प्रत्येक क्षेत्रात नवकल्पना आणि वेगळेपण अपेक्षित असून स्वतःमध्ये पालट घडवणे ही प्राथमिकता आहे. अभ्यासक्रम आणि उद्योगविश्व यांतील अंतर अल्प करण्यासाठी संशोधक वृत्ती जोपासायला हवी. नव्या संधी आणि संशोधनाची नवी क्षेत्रे यांनी खुली होतील. उद्योग विश्वातही पालट घडेल, असे डॉ. पी.के. सिन्हा यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही कार्यक्रमात विचार व्यक्त केले.
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २३.०६.२०२६)
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
तुळजापूर येथे निष्क्रीय पोलीस प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण !
ठाकरे गटाच्या ६ खासदारांचा शिवसेनेत प्रवेश !
आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !