देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !

असे समजते की, ‘झुरळे’ (कॉकरोच जनता पार्टीचे विघातक प्रवृत्तीचे लोक) देहलीमध्ये पूर्णपणे अराजकता माजवण्याच्या सिद्धतेत होते. त्यांचा उद्देश पोलिसांना कठोर कारवाई करण्यास भाग पाडणे आणि त्यानंतर ‘जेन-झी’ पिढीला (वर्ष १९९७ ते वर्ष २०१० या कालावधीत जन्मलेली पिढी) भडकवून देशभर हिंसाचार पसरवणे, हा होता; पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या या सर्व योजना अगदी प्रारंभीच्या टप्प्यावरच उधळून लावल्या.

१. आंदोलनापूर्वीच अमित शहा यांनी आंदोलकांना दिलेला मोठा धक्का

मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा अभिजित दिपके यांना जंतरमंतरवर ‘शांततापूर्ण’ निदर्शने करण्यासाठी देहली पोलिसांचे अनुमती पत्र देण्यात आले आणि त्यांना ‘पार्लमेंटरी पोलीस स्टेशन’ (संसद परिसरातील पोलीस ठाणे)ला न जाता थेट जंतरमंतरवर जाण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. सामना चालू होण्यापूर्वीचा हा एक निर्णायक आणि जोरदार धक्का होता; कारण गुप्तचर अहवालानुसार अराजकता माजवण्याची योजना जंतरमंतरवर नव्हे, तर खुद्द पोलीस ठाण्याच्या ठिकाणीच आखण्यात आली होती. त्यासाठी सर्व सिद्धता पूर्ण झाली होती. अखिल भारतीय विद्यार्थी संघटना ही साम्यवादी विचारसरणीची विद्यार्थी संघटना आणि जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील साम्यवादी विचारसरणीचे लोक, तसेच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटने’चे जिहादी, ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’चे नक्षलवादी आणि काही ‘एल्.जी.बी.टी.’ (‘लेस्बियन’ (समलिंगी स्त्री), ‘गे’ (समलिंगी पुरुष), ‘बायसेक्शुअल’ (उभयलिंगी), ‘ट्रान्सजेंडर’ (तृतीयपंथी)) गटांना संसद परिसरातील पोलीस ठाण्याबाहेर जमा होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

२. अराजक माजवण्याची आंदोलकांची योजना

योजना साधी वाटत होती. निदर्शनांसाठी पोलिसांकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (अनुमती) मागणे आणि पोलिसांनी ते नाकारणे (कारण असे प्रमाणपत्र कधीच त्वरित दिले जात नाही). त्यानंतर पोलिसांशी तीव्र वाद घालून तणाव वाढवणे. पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी फर्निचरची मोडतोड करणे. अराजकता माजवणे आणि काही जणांच्या अटकेनंतर स्वतःला ‘पीडित’ (व्हिक्टीम) म्हणून सादर करणे. त्यानंतर हा प्रकार भारताच्या इतर शहरांमध्ये पसरवणे आणि ‘जेन झी’ला रस्त्यावर उतरण्यासाठी प्रवृत्त करणे, हे सर्व या योजनेनुसार ठरवण्यात आले होते.

३. आंदोलकांना जंतरमंतरकडे वळवून त्यांची कोंडी करणे

असे असले, तरी अमित शहा हुशारीने वागले. देहली पोलिसांनी कुणी विचारायच्या आधीच ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले. त्यामुळे कारवाई थेट जंतरमंतरकडे वळली, जे पूर्वी मुळीच नियोजित नव्हते. आता जंतरमंतरवर प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीत ‘बॉडी कॅम’ (शरिरावर ध्वनीचित्रक) लावलेले साध्या वेशातील पोलीस, छायाचित्रकार, ‘ड्रोन’च्या माध्यमातून छायाचित्र काढणे, म्हणजे प्रत्येक चेहरा टिपला गेला, प्रत्येक ओळख पटली. ‘हिंसाचाराचा प्रयत्न करून बघा. पोलीस तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपर्‍यातून काही दिवसांत पकडतील. देहलीच्या सीमांना टाळे आणि मेट्रोवर कडक पाळत. पळून जायचा प्रयत्न करा, आम्ही तुम्हाला पकडणार’, अशी अप्रत्यक्ष एक प्रकारची चेतावणीच दिली गेली.

४. आंदोलनाविषयीच्या सरकारच्या योग्य धोरणामुळे आंदोलकांचा डाव उधळला !

परिणाम काय, तर ‘झुरळे’ गाफील राहिली. पुरेशी गर्दी जमवता आली नाही; कारण खरी ‘जेन झी’ पिढी या सर्कसमध्ये सामील होण्याइतकी मूर्ख नाही, तसेच पैसे देऊन जमवलेल्या गर्दीला मोठ्या संख्येने सांभाळता आले नाही; कारण जंतरमंतरपर्यंत पोचण्याची योजनाच नव्हती. याखेरीज कडक सुरक्षेमुळे साम्यवादी विचारसरणीचे गुंड जमवूनही काही करता आले नाही. ‘बसा, ओरडा, घोषणा द्या, नाटक  करा. दुपारनंतर तर प्रसारमाध्यमेही तुमच्याविषयीचे वार्तांकन करणे थांबवतील’; कारण काहीही ‘रोमांचक’ घडत नसते. सर्कस नैसर्गिकरित्या शांत होते. गाजावाजा संपला.

५. साम्यवाद्यांसाठी धडा

भारताचे बांगलादेश किंवा नेपाळ यांच्यासारखे रूपांतर करू पहाणार्‍या झुरळांसारख्या वृत्तीच्या लोकांवर आणि साम्यवादी विचारसरणीच्या विदूषकांसाठी काही महत्त्वाचे धडे –

अ. देशात मोदी सरकार आहे, जे बांगलादेश आणि नेपाळ येथे नव्हते.

आ. देशाकडे अमित शहा यांच्यासारखे गृहमंत्री आहेत.

इ. भारताच्या गुप्तचर संस्थांना कोणत्याही कुटील कारस्थानाचा बीमोड कसा करायचा आणि ‘सायकोलॉजिकल वॉरफेअर’ (मानसिक युद्ध) कसे लढायचे, हे उत्तम प्रकारे अवगत आहे.

ई. भारतातील ‘जेन झी’ खर्‍या अर्थाने समंजस आहे आणि ते त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. ज्या समृद्ध देशात ते रहातात, तो देश उद्ध्वस्त करण्यावर ते लक्ष केंद्रित करत नसून स्वतःच्या करिअरवर लक्ष एकाग्र करत आहेत.

उ. भारतातील ‘जेन झी’चा विरोधी पक्ष आणि त्यांचे हस्तक यांच्यावर विश्वास नाही.

ऊ. मोदी यांच्या नेतृत्वावर भारतियांचा विश्वास अढळ आहे.

(साभार : संकेतस्थळ)

संपादकीय भूमिका

साम्यवाद्यांचे अराजकतेचे प्रयत्न आणि संस्कृती पोखरण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न रोखण्यासाठी वैचारिक प्रतिवाद हवा !