जयपूर (राजस्थान) – येथे ‘लव्ह जिहाद’चे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. मोईन खान नावाच्या मुसलमान तरुणाने ३ हिंदु मुलीना त्याच्या जाळ्यात ओढले. मोईन खान याने २ तरुणींना बंदी बनवून त्यांच्यावर बलात्कार केला. तसेच मोईन याच्या २ अल्पवयीन मुसलमान मित्रांनीही या तरुणींवर बलात्कार केला. पोलिसांनी मोईन खान याला अटक केली आहे. त्याच्या अल्पवयीन मित्रांना पकडून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
मोईन खान ने पैसे लेकर नाबालिग दोस्तों से करवाया हिन्दू किशोरियों का गैंगरेप, खुद भी किया बलात्कार: राजस्थान में 3 हिन्दू लड़कियों को फाँसाhttps://t.co/autm8BKg40
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 19, 2023
१. एका १७ वर्षीय हिंदु मुलीने मोईन खान याच्या विरोधात जयपूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, मोईन खान तिला सिंधी कँप परिसरात भेटला. त्याने स्वत:चे नाव मोनू असल्याचे सांगितले आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मोईनने तिला साहाय्याचे आमीष दाखवून जलूपूरा येथील एका हॉटेलमध्ये नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला.
२. मोईन याने ज्या हॉटेलमध्ये या तरुणीला बंदी बनवून ठेवले होते, त्या खोलीत आणखी एका अल्पवयीन हिंदु मुलीला बंदी बनवून ठेवले होते, असे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले. तिच्यावरही मोईन आणि त्याचे साथीदार यांनी बलात्कार केला होता.
३. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जलूपुरा येथील हॉटेल गाठले आणि मोईन याला अटक केली. मोईन खानने इतरही अनेक मुलींना त्याच्या जाळ्यात अडकवल्याचे समोर आले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदु मुलींचे शील भ्रष्ट करून त्यांना आयुष्यातून उठवण्याचे कारस्थान धर्मांधांनी रचले आहे. हे रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत ! |