जळगाव येथे भूमी जिहादचा प्रकार !
अनधिकृत कबरी हटवण्याची भाविकांची मागणी

मुंबई – जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात तापी आणि पूर्णा या नद्यांच्या संगमावर १ सहस्र २०० वर्षांपासून ऐतिहासिक श्री क्षेत्र चांगदेव महाराज यांचे प्राचीन मंदिर स्थित आहे. ते भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित स्मारक आहे. या मंदिरात दर्गा बांधला जात असल्याचा आरोप करण्यात आला. मंदिरात कबरी आणि त्यावर हिरव्या चादरी दिसत आहेत.
१. प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर परिसरात कबर बनवून अतिक्रमण करणे किंवा अनधिकृत बांधकामे किंवा भविष्यात छोट्या कबरीचे दर्ग्यात (मुसलमानाचे थडगे असलेले ठिकाण) रूपांतर केल्या जाण्याच्या प्रयत्नांमुळे भाविक दुखावले आहेत. (असाच प्रकार मलंगगडावर झाला आणि हिंदूंचे श्रद्धास्थान धर्मांधांनी बळकावले ! – संपादक)
२. ‘एरंडोलचा पांडववाडा धर्मांधांच्या हाती लागला आणि पुढे हिंदूंना अनेक वर्षे त्यासाठी लढा द्यावा लागला. असा प्रकार चांगदेव महाराजांच्या मंदिराविषयी घडू नये. पुरातत्व विभागाने येथील अनधिकृत कबरी उद्ध्वस्त कराव्यात’, अशी मागणी भाविकांनी केली आहे.
३. हे १२ व्या शतकातील हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी याच्या पुनर्रचनेत मोठे योगदान दिले होते.
४. ‘मंदिराच्या परिसरात भूमी जिहादचा प्रकार चालू असून स्थानिक प्रशासन आणि भारतीय पुरातत्व विभाग यांनी हे अतिक्रमण लवकर हटवावे’, अशी भाविकांची मागणी आहे.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी