
ठाणे, २२ जून (वार्ता.) – कल्याण (पूर्व) येथे कचरा वेचून उदरनिर्वाह करणार्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून बंद घरात नेऊन अख्तर मणियार (वय ६० वर्षे) आणि सलीम शेख (वय ६२ वर्षे) यांनी तिच्यावर अत्याचार केला. २० जूनच्या मध्यरात्री मुलीचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून मुलीची सुटका केली आणि दोन्ही आरोपींना पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (धर्मांधांची मानसिकता जाणा ! कायद्याचे भय वाटत नसल्यामुळे असे कृत्य करण्याचे धाडस त्यांच्याकडून होते. – संपादक)
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटना, महिला संघटना आणि स्थानिक नागरिकांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक महेश गायकवाड यांनीही या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
मणियार चहाचा स्टॉल चालवतो, तर सलीम शेख हा रिक्शाचालक आहे. पीडित मुलगी अत्यंत गरीब घरातील आहे.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले
Uttarakhand Lady Doctor Harassed : हिंदु महिला डॉक्टरचा पाठलाग करून छेड काढणार्या आझमविरुद्ध गुन्हा नोंद