२ मुलांची आई असलेल्या महिलेचे कुवेतमध्ये नेऊन केले धर्मांतर
डूंगरपूर (राजस्थान) – राजस्थानच्या डूंगरपूर जिल्ह्यातील दीपिका हिला इरफान हैदर याने पळवून नेले. ‘हैदर याने हिंदु असल्याचे भासवून माझ्या पत्नीशी जवळीक केली. तिचा बुद्धीभेद केला आणि नंतर तिला कुवेतमध्ये नेऊन तिचे बलपूर्वक धर्मांतर केले’, असे आरोप पीडित महिलेच्या पतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.
राजस्थान के डूंगरपुर में 2 बच्चों की मां को कुवैत लेकर गया युवक: ब्रेन वॉश का आरोप, सोशल मीडिया पर तस्वीर साझा होने के बाद घरवालों को हुई जानकारी#Rajasthan https://t.co/hviS9nrZ0g
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) August 15, 2023
दीपिका हिचे पती मुंबईत काम करतात. ‘पत्नी दीपिका २ लहान मुलांसह गावातच रहात असे. काही दिवसांपूर्वी ती घरातून निघून गेली ती परत आलीच नाही. इरफान हैदरसोबत दीपिकाचे बुरख्यातील छायाचित्र समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले, असा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाविवाहित, तसेच २ मुलांची आई असलेली महिला मुसलमानासोबत पळून जाते, हे हिंदु स्त्रीचे नैतिक अधःपतन झाल्याचे द्योतक ! |