नवी मंबईत अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्‍याचार करणार्‍याला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – येथे रहाणार्‍या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्‍याचार केल्‍याप्रकरणी ५० वर्षीय विवाहित आरोपी महेंद्र म्‍हात्रे याला अटक करण्‍यात आली आहे. (वासनांधतेने गाठली परिसीमा ! – संपादक) पत्नी घरी नसतांना म्‍हात्रे शेजारी रहाणार्‍या मुलीला धमकी देऊन तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार करत असे. पीडित मुलीच्‍या कुटुंबियांना हे लक्षात आल्‍यावर त्‍यांनी तक्रार दिली. पोलिसांनी तात्‍काळ म्‍हात्रे याला अटक केली असून त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद केला आहे. आरोपीला न्‍यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.