
राहाता (जिल्हा अहील्यानगर) – श्रावण सोमवारच्या निमित्ताने प्रतिवर्षी निघणार्या ब्रजमंडल यात्रेवर ३१ जुलैला जिहादी मुसलमानांनी आक्रमण केले. या प्रसंगी गाड्या पेटवण्यात आल्या, दगडफेक करण्यात आली, गोळीबार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ विहिंप-बजरंग दल यांच्याकडून राहाता येथे निदर्शने करण्यात आली. या भ्याड आक्रमणाचा तीव्र निषेध विहिंप बजरंग दल, उत्तर नगर जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक यांनी केला आहे. मेवात येथील आक्रमणाचे सखोल अन्वेषण होऊन दोषींना तात्काळ शिक्षा करण्यात यावी, देशविघातक शक्तींना समूळ नष्ट करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली, तसेच स्थानिक पोलीस कार्यालयाच्या वतीने या संदर्भातील निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात आले.
या वेळी विहिंपचे योगेश मखाणा, बजरंग दलाचे जिल्हा बलोपासना प्रमुख तेजस मुर्तडक, तालुका संयोजक अनिकेत सोमवंशी आदींसह मोठ्या प्रमाणात विहिंप-बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court