उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. कृष्ण आचार्य हा या पिढीतील आहे !
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. कृष्ण राघवेंद्र आचार्य उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.६.२०२३)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
आषाढ शुक्ल दशमी (२८.६.२०२३) या दिवशी कृष्ण राघवेंद्र आचार्य याचा १५ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्याचे वडील श्री. राघवेंद्र आचार्य यांना कु. कृष्ण आचार्य याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
१. कृष्ण आचार्य याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
अ. ‘कृष्ण प्रत्येक कृती व्यवस्थित करतो.
आ. तो न्यायप्रिय असून त्याला अन्यायाची चीड आहे.
२. कृष्ण आचार्य याच्यामध्ये जाणवलेले पालट !
अ. आता त्याचा आज्ञापालन करण्याचा भाग वाढला आहे.
आ. त्याचा शाळेतील मुलांना समजून घेण्याचा भाग वाढला आहे.
‘गुरुदेवांच्या अपार कृपेमुळेच त्याच्यामध्ये हे पालट होत आहेत’, याची मला सतत जाणीव होते.’
– श्री. राघवेंद्र आचार्य (कु. कृष्ण आचार्य याचे वडील), कमला जगन्नाथ आर्केड, ब्राह्मणपुरी, मिरज. (१८.६.२०२३)
इतरांना साहाय्य करणारे आणि चुका स्वीकारून स्वतःमध्ये पालट करण्याचा प्रयत्न करणारे कु. राम अन् कु. कृष्ण राघवेंद्र आचार्य !
१. कु. राम आणि कु. कृष्ण आचार्य या दोघांमध्ये जाणवलेले समान पालट !
अ. ‘राम आणि कृष्ण दोघेही प्रतिदिन सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार घालून नामजप करतात अन् नंतर अभ्यास करतात.
आ. दोघेही आम्हाला (आई-बाबांना) आमच्या कामात साहाय्य करतात.
इ. त्यांची आई शाळेतून घरी परत यायच्या वेळी ते चहा आणि कशाय करून ठेवतात.
ई. दोघांच्याही सकाळ-संध्याकाळ प्रार्थना करणे आणि नामजप करणे यांत वाढ झाली आहे.
उ. दोघांचाही चुका स्वीकारण्याचा भाग वाढला आहे.
ऊ. दोघेही प्रत्येक कृती ‘आश्रमात सेवा करत आहोत’, या भावाने करतात.
गुरुदेवांची कृपा म्हणून मुलांची नावे ‘राम आणि कृष्ण’, असे ठेवायचे सुचले. त्यामुळे आम्हाला सतत नामजप करण्याची आणि गुरुदेवांचीही आठवण होते. यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. राघवेंद्र आचार्य (कु. राम आणि कु. कृष्ण यांचे वडील), ब्राह्मणपुरी, मिरज. (१८.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |