(म्हणे) ‘जिहादच्या माध्यमातून फ्रान्स बनेल इस्लामी देश !’-पॅलेस्टाईनचा मौलाना अबु तकी अल्-दिन-अल् दारी

  • पॅलेस्टाईनचा मौलाना अबु तकी अल्-दिन-अल् दारी याचा जुना व्हिडिओ प्रसारित !

  • एके दिवशी संपूर्ण पृथ्वीवर असेल इस्लामी राज्य !

पॅरिस (फ्रान्स) – राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली अनेक आपत्कालीन बैठका होऊनही फ्रान्समध्ये धर्मांध मुसलमान करत असलेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. काही अभ्यासकांनी फ्रान्समधील मुसलमान शरणार्थींना या हिंसाचाराला उत्तरदायी ठरवले आहे. अशातच वर्ष २०१९ मधील पॅलेस्टाईन येथील एका मौलानाचा (मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक) व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. यामध्ये तो म्हणत आहे की, एके दिवशी फ्रान्स हा इस्लामी देश बनेल. यामध्ये त्याने जिहादचा उल्लेख केला आहे.

पॅलेस्टाईनचा मौलाना अबु तकी अल्-दिन-अल् दारी याचा हा व्हिडिओ १२ मार्च २०१९ चा आहे. येथील अल अक्सा मशिदीत जमा झालेल्या मुसलमानांना संबोधित करतांना तो म्हणत आहे की,

१. जर्मनी आणि फ्रान्स येथील लोक म्हातारे झाले आहेत. तेथील युवक विवाहाला आवश्यक मानत नाहीत.

२. वर्ष २०५० मध्ये फ्रान्समध्ये वसलेल्या मुसलमानांची संख्या ही तेथील फ्रेंच नागरिकांपेक्षा अधिक होईल. असे असले, तरी आपल्याला केवळ संख्येवर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्याला याची निश्‍चिती केली पाहिजे की, मुसलमानांचा स्वत:चा एक असा देश असला पाहिजे ज्याच्या माध्यमातून अल्लासाठी जिहाद पुकारून पश्‍चिमी देशांतील लोकांना इस्लामपर्यंत नेता येऊ शकेल. जेव्हा लोकांना इस्लामचे वास्तविक रूप, इस्लाममध्ये शिकवली जाणारी दया आणि अन्य वैशिष्ट्ये दिसतील, तेव्हा ते स्वत: इस्लाम स्वीकारतील !

(म्हणे) ‘इतिहासात इस्लाम सर्वत्र होता, तर आताही ते शक्य !’

मौलाना अबु तकी अल्-दिन-अल् दारी पुढे म्हणतो की, केवळ ४०० वर्षांपूर्वी मुसलमानांच्या ओटोमान (उस्मान) साम्राज्याने ऑस्ट्रिया आणि पोलँड यांच्यावर विजय मिळवला होता. आमचे राज्य आजची ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नापर्यंत पोचले होते. सोव्हिएत संघातील सर्व माजी देश, तसेच काकेशसही इस्लामी शासनाच्या अंतर्गत होते. वर्ष १६४४ पर्यंत चीनवरही मुसलमान मंगोलांचे राज्य होते. वर्ष १५२६ मध्ये आपण हंगेरीला जिंकले, तर वर्ष १५८६ पर्यंत भारतावर इस्लामचे राज्य होते. या सर्वांतून मला हे सांगायचे आहे की, आजही इस्लामी देश प्रस्थापित करणे शक्य आहे. यासाठी आपल्याला इतिहासानुसार कृती करावी लागेल. इस्लामचा प्रसार करावा लागेल आणि अल्लाच्या इच्छेनुसार काम करावे लागेल. या माध्यमातून इस्लाम पूर्ण जगात पसरत जाईल.

संपादकीय भूमिका

इस्लामला शांतीचा धर्म म्हटले जाते. मग त्याच्या नावाखाली संबंधित मौलानाचे वक्तव्य, तसेच फ्रान्समध्ये चालू असलेला हिंसाचार यावरून इस्लामी देशांची ‘इस्लाम सहकार्य संघटना’, तसेच जगभरातील इस्लामी विद्वान गप्प का बसतात ? ते अशी वक्तव्ये आणि हिंसक कृत्ये यांच्या विरोधात उभे का ठाकत नाहीत ?