|

एटा (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील जलेसर शहरात हाशिम नावाच्या एका हकीमने (चिकित्सकाने) हिंदु असल्याचे भासवत असाहाय्य हिंदु महिलेला औषध देण्याच्या नावाखाली स्वत:समवेत नेले. तिचे अपहरण करून नंतर तिच्यावर बलात्कार केला. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी तिला बंधक बनवून त्याच्या सहकार्यांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एके दिवशी त्याच्या कचाट्यातून सुटून पीडितेने न्यायालय गाठले. न्यायालयाच्या आदेशावर पोलिसांनी हाशिमसह २ अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हिंदु संघटनांनी या प्रकरणी हाशिमला अटक झाली नसल्यावरून अप्रसन्नता दर्शवली आहे.
एटा में हकीम हाशिम ने हिन्दू महिला का इलाज के नाम पर पहले खुद रेप किया फिर बंधक बनाकर दूसरों से गैंगरेप कराया।https://t.co/QymS9jwEIq
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 19, 2023
मूळची मुरादाबाद येथील कटघर क्षेत्रात रहाणारी ४१ वर्षीय पीडिता तिच्या मुलासह जलेसरमध्ये भाड्याच्या घरात रहात होती. तिला असलेल्या एका आजारावर औषधोपचार चालू होता. अन्य लोकांच्या माध्यमातून तिला हाशिमविषयी समजल्याने ती उपचारार्थ त्याच्याकडे गेली. तेव्हा त्याने काळ्या जादूच्या माध्यमातूनच तिला बरे करता येईल, असे भासवले आणि हिंदु असल्याचे सांगून तिला विश्वासात घेतले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.
संपादकीय भूमिकाहिंदु महिला आणि मुली यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवणार्या अशा वासनांधांना आता फाशीची शिक्षाच सुनवायला हवी ! |
पार्थ रुग्णालयाच्या आधुनिक वैद्या संगीता गायकवाड यांना अटक
१५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड !
Pakistani ‘Grooming Gangs’: २ लाखांहून अधिक ब्रिटीश मुलींवर बलात्कार करणारे ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांतरांच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली