लव्ह जिहादच्या उपयोग करून भारतात ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण होत आहेत ! – सौ. भक्ती डाफळे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, सातारा

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चतुर्थ दिवस – मान्यवरांचे विचार

विद्याधिराज सभागृह, १९ जून (वार्ता.) – छत्तीसगड येथील आदिवीसी भागांत बांगलादेशातून आलेले मुसलमान हे हिंदु आदिवासी युवतींशी विवाह करून घरजावई होत आहेत. यातून आदिवासींची भूमी हडपण्याचे षड्यंत्र आहे. अशा प्रकारे छत्तीसगड येथील एक पूर्ण गाव मुसलमानबहुल झाला आहे.

सौ. भक्ती डाफळे

लव्ह जिहादचा उपयोग करून अशा पद्धतीने भारतात ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण होत आहेत. पूर्वी मोगल हिंदूंना भींतीमध्ये चिणून मारत होते. सद्य:स्थितीत हिंदु युवतींचे तुकडे करून शीतकपाटात ठेवले जात आहेत. मोगलांनी तलवारीच्या जोरावर हिंदूंचे धर्मांतर केले. आता प्रेमाच्या जाळ्यात फसवून हिंदु युवतींचे धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदु युवतींना आपला गौरवशाली इतिहास सांगायला हवा. संस्कारी मातेमुळेच आपणाला छत्रपती शिवाजी महाराज लाभले. हिंदु युवतींनी धर्मशिक्षण घेतले, तर त्या लव्ह जिहादला बळी पडणार नाहीत. हिदु युवतींना हिंदु संस्कृती शिकवायला हवी. धर्मानुसार आचरण केले, तर लव्ह जिहादला बळी पडणार नाहीत. लव्ह जिहादविषयी गावागावांत जागृती करण्यासाठी आपणाला अभियान राबवायचे आहे. वसतीगृह, गाव, शहर येथील हिंदु युवतींना धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण आपणाला द्यायला हवे. या अभियानात धर्मप्रेमींनी सहभागी व्हावे.