रामनाथी – हिंदु व्यापार्यांचा व्यवसाय मुसलमानांनी बळकावला आहे. मटण, चिकन विक्रीच्या व्यवसायामध्ये मुसलमानांनी मक्तेदारी निर्माण केली आहे. याचा अपलाभ उठवत मुसलमान ‘हलाल’ चिकन-मटणची विक्री करत आहेत. मुसलमानांची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी बेरोजगार हिंदु तरुणांनी या व्यवसायाकडे वळले पाहिजे. १५ टक्के मुसलमानांनी ८५ टक्के हिंदूंवर ‘हलाल’ पद्धती लादली आहे. ‘हलाल’पासून सुटका करून घेतांना कायदेशीर प्रणाली आणि पर्यावरण प्रणाली यांची ढाल पुढे केली जात आहे. हिंदूंनी ‘हलाल’ चिकन-मटण न खाता ‘झटका’ चिकन-मटण खाण्याचा निर्धार केला पाहिजे. त्यासाठी हिंदूंनी ग्राहक हक्क कायद्याचा आधार घेतला पाहिजे. ‘हलालमुक्त भारत’ सत्यात उतरवण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती अभियान राबवले पाहिजे, असे मत बेंगळुरू, कर्नाटक येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रशांत संबरगी यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या वेळी व्यक्त केले.
श्री. प्रशांत संबरगी पुढे म्हणाले की, हिंदु जनजागृती समितीने ‘हलाल’विषयी जागृती करण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. ‘हलाल’पासून मुक्ती मिळवण्यासाठी हिंदूंनी ग्राहक हक्क कायद्याचा आधार घेत ग्राहक मंचाकडे दाद मागितली पाहिजे. ग्राहक मंचाने ‘झटका’ मांसाला अनुमती देणारे निकाल दिले आहेत. हिंदूंना ‘झटका’ मांस उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही कृतीदल सिद्ध केले आहे. या कृतीदलाच्या माध्यमातून बेरोजगार हिंदु तरुणांना ‘झटका’ मांस उपलब्ध करून देणारी दुकाने चालू करण्यासाठी साहाय्य केले जात आहे, असे श्री. संबरगी यांनी सांगितले.