सैनिकाने व्हिडिओ प्रसारित करून केली होती कारवाईची मागणी !

चेन्नई (तमिळनाडू) – भारतीय सैनिकाच्या पत्नीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी रामू आणि हरि प्रसाद या दोघांना अटक केली आहे. हवालदार प्रभाकरन् असे या सैनिकाचे नाव असून त्याने या संदर्भात एक व्हिडिओ बनवून या घटनेची माहिती देत पोलिसांकडे साहाय्याची याचना केली होती. प्रभाकरन् तमिळनाडूतील पडवेडू गावचा रहिवासी आहे. सध्या तो काश्मीरमध्ये तैनात आहे. प्रभाकरन् याची पत्नी रुग्णालयात भरती आहे.
Army Jawan Claims Wife Thrashed, ‘Stripped Half-Naked’ By 120 Men In TN’s Thiruvannamalai, Police Call It ‘exaggerated’https://t.co/hZT0NzSe6q
— TIMES NOW (@TimesNow) June 12, 2023
१. प्रभाकरन् यांनी सांगितले होते की, माझी पत्नी तमिळनाडूमधील एका गावात भाड्यावर घेतलेले दुकान चालवते; मात्र काही लोक तिला बर्याच दिवसांपासून त्रास देत आहेत. गुंडांनी दुकानातील सामान बाहेर फेकले. त्यांनी माझ्या कुटुंबावर चाकूने आक्रमण केले आणि धमकावले. माझ्या पत्नीला अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन पाठवले असून त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. पोलीस महासंचालकांनी कृपया साहाय्य करावे.
#TamilNadu army jawan pleads for help, cops refute allegations,
CNN-News18 accesses the #exclusive footage of the alleged assault, @nimumurali brings in all the latest updates related to the case | @anjalipandey06 pic.twitter.com/MSgPE7qcvL
— News18 (@CNNnews18) June 12, 2023
२. भारतीय सैन्याने प्रभाकरन् यांच्या कुटुंबियांना संपूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे.
An Indian Army soldier in uniform gave a statement fearing for the safety of his family. Army has already contacted the #Police authorities who have assured all help post investigation.
One of the accused has already been arrested. Action is at hand to arrest others. The… https://t.co/MdtToLuMgG
— NORTHERN COMMAND – INDIAN ARMY (@NorthernComd_IA) June 11, 2023
स्थानिक सैन्याधिकारी कुटुंबाच्या संपर्कात आहेत आणि सैनिकाच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि नागरी प्रशासन यांच्याशी बोलले आहेत.
संपादकीय भूमिकाभारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! |
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक