देहलीतील लव्ह जिहादची घटना !
नवी देहली – राजधानी देहलीतील साक्षी नावाच्या हिंदु मुलीची तिच्या मुसलमान प्रियकराने केलेली अमानवीय हत्या ताजी असतांनाच तेथे लव्ह जिहादचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. इन्स्टाग्रामद्वारे स्वत:ची खोटी ओळख सांगून हिंदु मुलीला फसवणार्या शाहरूख या लव्ह जिहाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Delhi: Shahrukh pretends to be Hindu to lure a Hindu girl, starts blackmailing after she broke up knowing the truth, arrested but police say it’s not love jihadhttps://t.co/W9UT8cg0vY
— OpIndia.com (@OpIndia_com) June 11, 2023
शाहरूखने वर्ष २०२० मध्ये एका हिंदु मुलीला स्वत: हिंदु असल्याचे भासवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिच्यावर बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याच्या धमक्या देऊ लागला. जानेवारी २०२३ मध्ये मुलीला तो मुसलमान असून त्याचे नाव शाहरूख असल्याचे लक्षात आल्यावर तिने त्याच्याशी बोलणे थांबवले. त्यामुळे शाहरूख तिला आणि तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला. धैर्य दाखवून तिने शाहरूखच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई चालू आहे.
संपादकीय भूमिका
|