
ठाणे – भिवंडी येथील खंडूपाडा परिसरातील एका उपाहारगृहामध्ये शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर ८८ जणांना विषबाधा झाली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी उपाहारगृहाचा चालक दिलशाद अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. (नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या उपाहारगृह चालकाविरुद्ध कठोर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक) विषबाधा झालेल्या सर्वांना उपचारांसाठी येथील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
प्रारंभी एका कुटुंबातील ६ जणांसह १४ जणांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर आणखी ७४ जणांना तसाच त्रास जाणवल्याने बाधितांची संख्या ८८ वर पोचली. रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. माधवी पदारे यांनी सर्व रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे ( दि : २२.०६.२०२६ )
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस
Madrassa Cleric Bail Rejected : ६३ वर्षीय मौलवीने ८ वर्षीय विद्यार्थिनीवर केले होते अत्याचार
संवाद साधण्याचा प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – मुख्यमंत्री
नालासोपारा येथे २ मुसलमान अमली पदार्थ तस्करांना अटक
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !