लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या

आरोपीवर कठोर कारवाई करण्याची हिंदु महासभेची मागणी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील इंदिरानगर या मुसलमानबहुल भागात अल्पवयीन मुलाने १४ वर्षांच्या मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. पोलिसांनी बलात्कारी मुलाला अटक केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदु महासभेकडून करण्यात आली आहे. मुलीच्या मामाने सांगितले की, हा परिसर मुसलमानबहुल असून येथील धर्मांध मुसलमान गुंड या भागात गुंडगिरी करत असतात.

संपादकीय भूमिका 

‘बलात्कार करणार्‍यांना अल्पवयीन म्हणायचे का ?’, हाच प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जनतेला वाटते !