|
नवी देहली – ‘द सियासत डेली’ या भारतीय वृत्तसंकेतस्थळाने भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये मुसलमानांचे प्रतिनिधित्व अल्प असल्याचे सांगून त्याचे खापर भारत सरकार आणि व्यवस्था यांवर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. संकेतस्थळाने प्रसारित केलेल्या बातमीमध्ये म्हटले आहे की, गेल्या ५ वर्षांप्रमाणेच वर्ष २०२२ मध्येही भारतीय प्रशासकीय सेवेत निवडलेल्यांमध्ये केवळ ६ मुसलमान आहेत. याआधीच्या वर्षांमध्येही एकूण उमेदवारांपैकी केवळ १ ते ५ टक्के मुसलमानच प्रशासकीय अधिकारी झाल्याचा दावा संकेतस्थळाने केला आहे.
How many Muslims become IAS officers every year?https://t.co/Y6TSk85NAD
— The Siasat Daily (@TheSiasatDaily) June 4, 2023
बातमीतून ‘भारत सरकार मुसलमानांवर अन्यायच करत आहे’, असाच संकेत देण्यात आला आहे. वर्ष २०११ मध्ये मुसलमानांची लोकसंख्या ही १४.२ टक्के असतांना ती वाढवून १७.२ टक्के असल्याचे सांगत त्यांपैकी केवळ १ ते ५ टक्के मुसलमानांनाच या सेवेमध्ये निवडले जाते, अशा प्रकारे धादांत खोटारडेपणा केल्याचे या बातमीतून लक्षात येते.
संपादकीय भूमिका
|