लातूर येथे धर्मांधाला अटक
लातूर – गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे रहाणार्या एका ११ वर्षीय हिंदु मुलीची फेसबूकवर एका धर्मांधासमवेत मैत्री झाली. तो धर्मांध पूर्वी गोरखपूर येथे रहात होता. धर्मांध २ वर्षांपूर्वी अल्पवयीन हिंदु मुलीला खोट्या प्रेमात अडकवून फूस लावून महाराष्ट्रातील लातूर येथे घेऊन आला. दुसरीकडे घरातून मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांनी मुलीच्या घरात मिळालेल्या २ भ्रमणभाष क्रमांकावरून शोध घेत लातूर येथे आरोपी दस्तगीर शेख याला लातूर जिल्ह्यातील बदुरे गावातून अटक केली. हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे आहे का ? याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत. (‘हातच्या काकणाला आरसा कशाला ?’ समोर लव्ह जिहादचे प्रकरण अतिशय स्पष्ट आणि उघड पणे दिसत असतांना त्याचा शोध घेण्यापेक्षा धर्मांधाला अधिकाधिक कडक शासन होण्यासाठी काय करायला हवे ? हे पोलिसांनी पाहिले पाहिजे ! – संपादक)
पोलिसांना शोध घ्यायला लागली तब्बल २ वर्षे !
१. मुलीच्या कुटुंबियांनी घरात मिळालेल्या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क केला असता धर्मांधाने त्याचे नाव शेख सांगून ‘तुमची मुलगी माझ्यासमवेत आहे. ती परत येणार नाही. मुलीला विसरून जा. अन्यथा परिणाम वाईट होतील’, अशी धमकी दिली.
२. आरोपीच्या या धमकीमुळे मुलीचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी २४ डिसेंबर २०२१ या दिवशी पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी भ्रमणभाष क्रमांकाच्या आधारे अन्वेषण चालू केले होते. २ वर्षे पोलीस त्या धर्मांध आरोपीचा शोध घेत होते; मात्र मुलीचा आणि धर्मांधाचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर २९ मे या दिवशी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपीचा ठावठिकाणा लागला.