संगमनेर (जिल्हा नगर) – शहरातील जोर्वे नाका येथे पिकअप वाहनातून जातांना हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून ‘पिकअप’मधील लोकांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करून उपचारानंतर घरी परतत असणार्या या लोकांवर पुन्हा १०० ते १५० लोकांनी त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार दिली; म्हणून २८ मे या दिवशी धारदार शस्त्रांंचा वापर करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीमध्ये ८ जण गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आरोपींमध्ये बाबू टपरीवाला, इमरान वडेवाला, नदीम शेख, इम्रान, साफीक चहावाला, साफिक, इरफान पठाण, शाहिद वाळूवाला, मुसेफ शेख, इफू वडेवाला, अराफत शेख, इरफान वडेवाला यांच्याकडे काम करणारे तिघे जण, यांच्यासह अन्य १०० ते १५० जणांचा समावेश आहे. (धर्मांधांचा उद्दामपणा रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक) या प्रकरणी घायाळ रवींद्र गाडेकर यांच्या तक्रारीवरून वरील आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले की, संगमनेर शहराची कायदा, सुव्यवस्था, शांतता बिघडवण्याचा कुणी प्रयत्न करत असेल आणि तो कुणीही आणि कितीही मोठा असला तरी अशा गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. आरोपींवर पोलीस कडक कारवाई करतील.