पुसेगाव (जिल्हा सातारा) येथील सरपंच ठरले अपात्र !

( प्रातिनिधिक छायाचित्र )

सातारा, २५ मे (वार्ता.) – राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्‍या पुसेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विजय मसणे यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बांधकाम केल्याने जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी मसणे यांना अपात्र ठरवले आहे. सदस्यत्व रहित झाल्यामुळे आता मसणे यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. (असे लोकप्रतिनिधी  कारभार कसा करत असतील, याची कल्पना येते ! – संपादक) मसणे यांच्या मालकीची मिळकत सार्वजनिक रस्त्याच्या सीमेत असल्याचे भूमीअभिलेख अधिक्षक यांनी दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मसणे यांनी शासनाच्या जागेत कायमस्वरूपी बांधकाम करत अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे. शोभा मसणे यांनी विजय मसणे यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज केला होता. हा तक्रार अर्ज ग्राह्य धरून जिल्हाधिकारी जयवंशी मसणे यांना अपात्र ठरवले आहे.