देहू येथील गायरानाची जागा विकासासाठी मिळण्याचा प्रस्ताव सादर !

देहू – येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत विविध विकासकामे होणे आवश्यक असल्याने सरकारी गायरानातील १४८ एकर जागेवर विविध विकासकामे देहू नगरपंचायत प्रशासनाने सुचवली आहेत. या कामांना १४८ एकर जागा मिळावी, या विषयीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकार्‍यांना सादर करण्यास संमती दिली आहे. गायरानातील जागेवर नगरपंचायत कार्यालय, अग्नीशमन केंद्र, शाळा, संत तुकाराम महाराज शिल्प आणि घाट विकसित करणे, वाहनतळ, घनकचरा व्यवस्थापन, डंपिंग ग्राउंड, भुयारी गटार प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्र, यात्रा सुविधा केंद्र, मुख्याधिकारी निवास, मंडई, ऑडिटोरियम, ग्रंथालय, क्रीडांगण, दफनभूमी, बगीचा, रुग्णालय, ‘पंपिंग स्टेशन’ आदींसाठी जागा मिळण्याच्या संदर्भात ठराव करण्यात आला आहे.