मानसिक तणावापोटी धमकी दिल्याचे उघड
नांदेड – जिल्ह्यातील नावंदी (तालुका नायगाव) येथील एका तरुणाने मुंबई उडवून देण्याची धमकी दिली होती. आतंकवादविरोधी पथकाच्या साहाय्याने मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस नायगाव येथे पोचले. तोपर्यंत नायगाव पोलिसांनी श्रीपाद गोरठकर (वय १९ वर्षे) या तरुणाला कह्यात घेतले होते. नंतर त्याला चौकशीसाठी नेण्यात आले. २ दिवसांपूर्वी ट्विटरवरून मुंबई उडवून देण्याची धमकी दिली होती. बनावट आयडीवरून हा संदेश केला होता. हा तरुण वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. मानसिक तणावाखाली येऊन त्याने हा प्रकार कल्याचे म्हटले जात आहे. श्रीपाद गोरठकर हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याचे वडील कमलाकर गोरठकर हे गडगा येथे औषधांचे दुकान चालवतात.