सकाळी व्यायाम करतांना श्री गुरुचरणी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी) प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा माझ्या मनात आले, ‘श्री गुरूंच्या चरणी स्तुतीसुमने उधळावीत.’ त्या विचारानेच माझे मन भरून आले आणि पुढील भावसुमने माझ्या मनःपटलावर उमटली.
‘गुरु (टीप १) माझा कल्पतरू ।
आहे कलियुगातील विश्वगुरु ।। १ ।।
भक्तांनी साठवले डोळ्यांत त्यांचे रूप ।
करतात ते भक्तांच्या इच्छा फलद्रूप ।। २ ।।
भावभक्तीचा देव (टीप २) भुकेला ।
मोक्षदाता होऊन जीवन उद्धारण्या आला ।। ३ ।।
त्यांच्यावरील प्रेमाने साधकजनांचा भरतो मेळा ।
भक्तांच्या हृदयातील ते जणू चैतन्याचा गोळा ।। ४ ।।
असे त्रिभुवनात त्यांची कीर्ती ।
जीवन उद्धारण्यासाठी आली साधकसागरा भरती ।। ५ ।।
विष्णु अवतार त्यांचा साधकजनांनी पाहिला ।
विश्वरूप दाखवण्या विश्वंभर (टीप ३) भगवान अवतरला ।। ६ ।।
नमन करू सारे जन या विश्वंभराला ।
जन्मोजन्मी तव चरणांची घडो सेवा, हीच प्रार्थना देवाला ।। ७ ।।
टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ : परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप ३ : विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले
– श्री. अविनाश जाधव (आध्यत्मिक पातळी ६० टक्के, वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२३.४.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |