त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदु महासभेकडून शुद्धीकरण !

  • मुसलमानांनी बळजोरीने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण

  • कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडले, जोरदार घोषणाबाजी !

हिंदु महासभेच्या वतीने गोमूत्र शिंपडून त्र्यंबकेश्‍वर मंदिराचे शुद्धीकरण

नाशिक – जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदु महासभेच्या वतीने  १७ मे या दिवशी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. १५ मे या दिवशी मुसलमानांनी बळजोरीने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा असा प्रयत्न होऊ नये, यासाठी आम्ही हे शुद्धीकरण केले आहे, असे हिंदु महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात इतर धर्मियांनी चादर चढवण्याची परंपरा नाही !

सकाळी ११ वाजता हिंदु महासभेचे कार्यकर्ते मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर जमा झाले. त्यांनी गोमूत्र शिंपडून प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण केले. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलीस आणि मंदिर प्रशासन यांना निवेदन देऊन या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

याविषयी आनंद दवे म्हणाले की, काही जणांनी मंदिरात बळजोरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नाशिकचीच जनता पुरेशी आहे; मात्र त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज राज्यभरातून कार्यकर्ते येथे आले आहेत. हिंदुस्थानचे राष्ट्रगीत नाकारणार्‍यांनी त्र्यंबकेश्‍वर मंदिरात बळजोरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आम्ही गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले आहे. त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. सर्व जण येथे दर्शनासाठी येत असतात; मात्र या मंदिरात इतर धर्मियांनी चादर चढवण्याची परंपरा नाही.

उरूस आयोजकांविरुद्ध गुन्हे नोंद !

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ‘एस्.आय.टी.’ची स्थापना करण्याचा आदेश दिला असून आतापर्यंत ४ उरूस आयोजकांविरुद्ध  गुन्हा नोंदवण्यात आला आहे.