पोलीस चौकीमध्ये प्रमुखाच्या खुर्चीवर बसून दारू पिणार्‍या मुसलमान तरुणाला अटक !

सामाजिक माध्यमांतून छायाचित्र प्रसारित झाल्यावर पोलिसांकडून कारवाई

पोलीस चौकीचा प्रमुखाच्या खुर्चीवर बसून दारू पिणार्‍या इम्रानला अटक

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथील खाताखेडी पोलीस चौकीचा प्रमुखाच्या खुर्चीवर बसून दारू पिणार्‍या इम्रान नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या खुर्चीवर बसून तो दारू पित असलेले छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी चौकी प्रमुखाला निष्काळजीपणा केल्यावरून निलंबित केले आहे, तसेच या प्रकरणारच्या चौकशीचा आदेश दिला आहे. इम्रान याने ‘मी दारूच्या नशेत चौकशीसाठी आलो आणि पोलीस प्रमुखाच्या खुर्चीवर बसून दारू पिऊ लागलो’, असे सांगितले.

संपादकीय भूमिका

जर अशा प्रकारे छायाचित्र प्रसारित झाले नसते, तर पोलिसांना या घटनेची माहितीच मिळाली नसती, असेच लक्षात येते ! हे पोलिसांना लज्जास्पद !