चोरलेला किंवा हरवलेला भ्रमणभाष शोधणे आता शक्य !

१७ मे या दिवशी देशभरात चालू होणार आधुनिक प्रणाली !

नवी देहली – केंद्र सरकारकडून १७ मे या दिवशी ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ ही अत्याधुनिक प्रणाली देशभरात चालू करण्यात येणार असून त्यामुळे आता चोरलेला किंवा हरवलेला भ्रमणभाष शोधणे किंवा तो बंद (ब्लॉक) करणे शक्य होणार आहे. आतापर्यंत ही प्रणाली’ देहली, महाराष्ट्र, कर्नाटक, ईशान्येतील राज्ये येथे पथदर्शी प्रकल्पाच्या स्वरूपात कार्यान्वित होती. आता ही सुविधा देशभर लागू होईल.

संबधितांना दूरसंचार विभागाच्या ‘https://www.ceir.gov.in’ या संकेतस्थळावर तक्रार करावी लागेल. त्याआधी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करणे अनिवार्य आहे. या प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत २ लाख ४२ सहस्र ९२० भ्रमणभाष शोधण्यात यश मिळाले आहे.